Test Post 1
पल्या अवतीभवतीचे विश्व आपण बघतो व विविध ज्ञानेंद्रियांच्या साह्याने समजून घेतो परंतू विश्व हे अमर्याद असून आपल्या संवेदनेच्या आकलन क्षमतेच्या मर्यादे पलीकडचे आहे. विश्व हे विविध वस्तूचे बनलेले आहे यामध्ये वृक्ष, पर्वत, दगड, मती,नदी,डोंगर,ग्रह, तारे इ. चा समावेश होतो. या विश्वातील वस्तूंचे संघटन कसे कार्य करते, त्यांच्यात कशाप्रकारे बदल घडून येतात हे समजून घेण्यासाठी द्रव्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
द्रव्य :
सर्व पदार्थ हे द्रव्याने बनलेले आहे.
द्रव्याला वस्तुमान व आकारमान असते व ते जागा व्यापते. द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी
बनलेली असते.
द्रव्याच्या अवस्था :
स्थायु :
स्थायू पदार्थांना विशिष्ट आकार व
विशिष्ट आकारमान असते
द्रव :
विशिष्ट आकारमान असते परंतु आकार नसतो
द्रवाच्या वाहून जाण्याच्या
गुणधर्माला प्रवाहित म्हणतात.
वायु :
वायु पदार्थांना विशिष्ट आकार व आकारमान दोन्ही नसते.
वायूचे वहन नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे होते.
प्रवाहिता हा वायु चा गुणधर्म आहे
तसेच वायू धातूच्या टाक्यांमध्ये ठासून भरून ठेवता येतो या गुणधर्माला सांपिड्यता म्हणतात.
अयनायू (Plasma) :
ही द्रव्याची चौथी अवस्था मानली जाते या अवस्थेत पदार्थ पूर्णतः स्थायू किंवा पूर्णतः द्रव नसतो प्लाझमा पदार्थ साठवण्यासाठी 600 °c पेक्षा जास्त तापमान लागते तसेच चुंबकाचे भांडे लागते.
राष्ट्रीय प्लाझमा संशोधन केंद्र अहमदाबाद येथे आहे.
बॉस आईन्स्टाईन कंडेन्सट :
ही पदार्थाची पाचवी अवस्था मानली
जाते.
1920 मध्ये भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी केलेल्या
गणनेच्या आधारावर आईन्स्टाईननी या अवस्थेची भविष्यवाणी केली होती.
'एरिक ए कार्नेलआणि कार्ल इ.वेमेन' यांना 2001
मध्ये बोस आईन्स्टाईन कंडेनसेटची अवस्था प्राप्त करण्यासाठी भौतिकशास्त्राचे
नोबेल मिळाले.
द्रव्याची भौतिक स्थिती समजून घेण्यासाठी द्रव्याच्या घटक कणांमधील
आकर्षण बलाचा उपयोग होतो.
द्रव्याचे रेणू जेव्हा एकमेकांच्या अतिशय जवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कार्यरत असलेले आकर्षण बल म्हणजे आंतरेण्वीय बल होय.
स्थायू मध्ये आंतरेण्वीय बल अतिशय प्रभावी असते द्रवा मधील बल मध्यम असते तर वायूधील क्षीण असते.
आंतरेण्वीय बल उतरता क्रम :स्थायू .> द्रव > वायू
अवस्थांतर द्रव्याची अवस्था तापमानानुसार बदलते अवस्थांतरामुळे
पदार्थाचे भौतिक गुणधर्म बदलतात परंतु रासायनिक गुणधर्म बदलत नाही
उदा उष्णता दिल्यावर बर्फाचे पाणी व पाण्याची वाफ होणे.
पाणी ३२°F ला गोठते आणि 212°F डिग्रीला उकळते हे परिमाण १७२७ साली गेब्रियल डॅनियल फॅरनहाइट यांनी
जगासमोर मांडले.
रुपांतरणाचे सूत्रे : F = - ३२ x ५/९ = १°c
-40 °सें. या तापमानाला सेंटीग्रेड व फॅरनहाइट सारखेच असते.
बाष्पीभवन उत्कलन बिंदू च्या खालील कोणत्याही तापमानाला द्रवरूप
पदार्थाचे वायुरूप पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात.
संगनन : संगनन म्हणजे वाफे पासून द्रवाचे थेंब तयार होणे.
उदा. ढगांची निर्मिती.


Leave a Comment